अमरावती : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या क्र. 9 गटामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. या रूग्णालयात पॅथॉलॅाजी लॅब सुरू करण्यात येणार आहे.
या लॅबमध्ये सेमी ऑटो बायोकेमेस्ट्री मशिन, हेमॅटोलॉजी मशिन आणि इम्युनोएसे मशिन आदी यंत्रणा असेल. ती हाताळण्यासाठी मानधन तत्वावर डीएमएलटी किंवा पीजीडीएमएलटी पात्रता असणाऱ्या एका उमेदवाराची मुलाखतीद्वारे नेमणूक होणार आहे.
इच्छूकांनी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कल्याण शाखा, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.9, अमरावती येथे पाठविण्याचे आवाहन समादेशक हर्ष ए. पोद्दार यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या