Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

नरखेड भुसावळ पॅसेंजर सुरू करा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करू !

 

मोर्शी : नरखेड - भुसावळ, नागपूर - आमला,  पॅसेंजर येत्या आठ दिवसांत सुरू करावी अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. 
लॉकडाउननंतर राज्यभर लोकल व पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झालेली असताना नरखेड भुसावळ, आमाला नागपूर अशी एकही पॅसेंजर गाडी सुरू झालेली नाही.
 अमरावती जिल्ह्यातील तसेच नागपूर जिल्ह्यातील दररोज हजारो नागरिक पॅसेंजरने प्रवास करतात. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउन काळापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, इतर नागरिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी हे सर्व रेल्वे प्रवाशी पॅसेंजर रेल्वेसेवा बंद असल्याने दुचाकी व चारचाकी गाड्यांनी प्रवास करीत आहेत. हा प्रवास शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे हजारो नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
       लॉकडाउन नंतर राज्यभर लोकल व पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झालेली असतांना नरखेड भुसावळ, नागपूर आमला, यासह अशी एकही पॅसेंजर गाडी सुरू झालेली नाही. आता रेल्वे प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. पॅसेंजर गाडी सुरू न झाल्यामुळे बेरोजगारीमध्ये वाढ होत आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या मंडळ प्रबंधकांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मागणी करून प्रवाशांच्या भावना पोहचविल्या.

      प्रवाशांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या संयमाचा अंत न पाहता, नरखेड भुसावळ, नागपूर - आमला पॅसेंजर येत्या आठ दिवसांत सुरू करावी. या पेंसेंजर गाड्या सुरू न केल्यास तीव्र स्वरूपात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी दिला आहे.
  सद्यःस्थितीत एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू असली तरी त्यासाठी आरक्षण मिळत नाही. शिवाय तिकीटही महागडे असते, जे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. मागील काळात अप-डाउन करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना खडतर रस्त्याच्या मार्गे प्रवास करावा लागल्याने लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, काही घटनांमुळे काहींचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे नरखेड - भुसावळ, नागपूर - आमला या पेंसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागनार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code