Header Ads Widget

खांद्याच्या दुखण्यावर करा घरगुती उपाय...

    खांद्याच्या दुखण्यामागे बरीच कारणे असू शकतात. दुखापत, सातत्याने होणारी हालचाल, वजनदार वस्तू उचलणे, अपघात, खेळणे किंवा वाढते वय या कारणांमुळे खांद्यांचे दुखणे उद्भवू शकते. खांद्याच्या दुखण्यामुळे हातांच्या हालचालींवर र्मयादा येतात. खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात.

    व्यायामाने या वेदनांवर नियंत्रण मिळवता येते. इतकंच नाही तर, या व्यायामाचे दीर्घकालीन लाभही आहेत. व्यायामामुळे स्नायू लवचिक व्हायला मदत होते. खांदे मागून पुढे फिरवणे, बालासन, खांद्यांचे स्नायू ताणणे, डंबेल्स उचलणे अशा व्यायामांमुळे लाभ होऊ शकतात. हे सर्व व्यायाम अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. शिवाय ते तुम्ही कुठेही करू शकता. हे व्यायाम नियमित केल्यामुळे वेदना बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात.

    खांदा बराच काळ दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. खांद्याच्या व्यायामांनी आराम मिळाला तर डॉक्टरांकडे जाण्याची गरज लागणार नाही. पण खांद्यांमध्ये सूज, तीव्र स्वरूपाच्या वेदना, हात आणि खांद्यांमध्ये जाणवणारा अशक्तपणा, हातांमधल्या संवेदना जाणे, खांद्यांमध्ये हालचाल करताना त्रास होणे अशी लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांकडे जायला हवे. खांद्याच्या दुखण्यावर काही घरगुती उपाय करता येतील. अनेकदा जीवनशैली, चुकीच्या पद्धतीने बसणे, झोपणे यामुळे खांद्यांचे दुखणे उद्भवते. त्यामुळे आपण जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. नियमत व्यायाम करणे गरजेचे आहे. खांदेदुखीला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टी टाळायला हव्यात. खांद्यांमध्ये दाह जाणवत असेल तर दाह कमी करणारी औषधे घेता येतील.

    अन्यथा, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, ऑलिव्ह ऑईल, मासे, स्ट्रॉबेरी, संत्री, ब्लूबेरी अशी फळे यांचा आहारात समावेश करायला हवा.दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास शस्त्रक्रियेची गरज लागू शकते. खांदेदुखी तीव्र स्वरूपाची नसेल तर गरम आणि गार पाण्याचा शेकही देता येईल. खांद्याच्या दुखण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. नेमके निदान करून त्यावर उपचार होणे आवश्यक असल्यामुळे याकडे अजबात दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निरोर्गंी आयुष्य जगा.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या