Header Ads Widget

लिलाव...

    लढूया पुन्हा नव्याने
    जगण्यास अर्थ आहे
    सरलेच जरी सारे
    बाकी बरेच आहे
    लीलाव आभूषणांचा
    बघ होतं जरी आहे
    भाळी शोभे सख्या रे
    कुंकवाचे तेजपुंज आहे
    नीतिभ्रष्ट माणसांनी
    केला लिलाव आहे
    बोली भावनांची
    बेभाव होत आहे
    का म्हणतोस हरलो आता
    हा आरंभ होत आहे
    आशा पुन्हा नव्याने
    वाटेत सज्ज आहे
    आतुरली बघ ही
    घरट्यातं पाखरे आहे
    पंखास बळ त्यांच्या
    बघ तुलाच द्यायचे आहे
    -सौ. शितल राऊत
    अमरावती
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या