गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग व त्यांच्या ग्रामगीतेने देशात होत असलेल्या सकारात्मक समाजपरिवर्तन लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न उपाधी प्रदान करावी अशी मागणी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली.
गुरुकुंज आश्रम येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राष्ट्रसंतांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आले होते याप्रसंगी अमरावती ग्रामीणचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे शिष्ठमंडळ भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटले याभेटीत राष्ट्रसंतांच्या कार्यालबद्दल निवेदिता चौधरी यांनी माहिती देऊन भारतरत्न प्रदान करण्यासाठी राज्यसरकारच्या मार्फत त्वरित केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा याबद्दल चर्चा केली.
राज्यपालांनी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व आपली प्रयाग येथे १९६६ साली भेट झाली होती आपण त्यांच्या कार्याबाबत परीचित आहे असे सांगून सकारात्मक प्रतिसाद राज्यपालांनी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना दिला चर्चा करतांना दिला.यावेळी किसान आघाडीचे महामंत्री डॉ अनिल बोंडे भाजपाचे सरचिटणीस प्रवीण तायडे,प्रशांत शेगोकर, राजेश पाठक, भाजपा तालुका अध्यक्ष निलेश श्रीखंडे,सरचिटणीस शंतनू देशमुख,सागर शिंगाने,राजेश नेवारे,विजय पुनसे,नीलिमा बोके यांच्यासह भाजपा ग्रामीणचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या