Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधेचे उद््घाटन

    अमरावती:मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधेचे उदघाटनाचे आयोजन शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर,२0२१ रोजी सकाळी ११.00 वाजता विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले.

    या उदघाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता तुषार भारतीय, नगरसेवक मिलींद चिमोटे, गोपाल धमार्ळे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, लविणा हर्षे, वंदना हरणे, रिता मोकलकर, अनिता राज उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधेचे उदघाटन मा.महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकरिता व प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान व्हावे याकरिता अमरावती महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरता येईल.

    मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याकरिता नेटबॅंकींग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, पे टीएम, भिम युपीआय विविध वॉलेट्स व क्यूआर कोड इत्यादी माध्यम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कर भरल्यानंतर त्याबाबतचा मॅसेज, एसएमएस नागरिकांना त्यांचा मोबाईल वर प्राप्त होईल व तेथूनच कर भरल्याची पावती डाऊनलोड करता येईल.तसेच लवकरच नागरिकांकरिता सिटीजन अँप महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सिटीजन अँप वापर करुन सुध्दा नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता येईल व इतर सुविधांचा सुध्दा लाभ घेता येईल.वसुली लिपिकांकडील पावती पुस्तके आता कालबाह्य होणार असुन आता पीओएस मशीनचा वापर करुन वसुली करण्यात येणार आहे.अमरावती महानगरपालिका नागरिसुविधा केंद्र व झोन कार्यालय येथे सुध्दा मालमत्ता कराचा भरणा नागरिकांना करता येईल.

    ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा करतांना काही अडचण आल्यास हेल्पलाईन पोर्टलवर सुरु करण्यात आला आहे. लवकरच इतर सेवा ऑनलाईन करण्याकरिता प्रशासन प्रयत्नरत आहे. मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले की, कॅशलेस व्यवहारकरीता प्रोत्साहन देण्याकरीता व प्रशासनच्या कामात पारदर्शकता व अधिक गतिमानता आणण्?याकरीता नागरिकांसाठी मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याकरिता नेटबॅंकींग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, पे टीएम, भिम युपीआय विविध वॉलेट्स व क्यूआर कोड इत्यादी माध्यम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने आवाहन केले की, नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्याव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code