Recent in Technology

Advertisement

Breaking News

एसटी महामंडळाचे संप मागे घेण्याचे कर्मचार्‍यांना आवाहन

    मुंबई : गेल्या आठवड्यातील बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू झाला आहे. आता राज्यातील २५0 डेपो हे जवळपास बंद आहेत. ग्रामिण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला आहे. संप जरी गेल्या आठवड्यात सुरू झाला असला तरी दिवाळीच्या आधीपासूनच एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे १४ दिवसांपेक्षा जास्त काळ राज्यातील एसटी सेवा कोलमडलेली आहे.

    असं असतांना एसटी महामंडळाकडून कर्मचार्‍यांसाठी जाहीर आवाहन करण्यात आले नव्हते. उलट सोशल माध्यमांद्वारे एसटी देत असलेल्या विविध सेवा सुविधांबद्द्लची माहिती तसेच विविध प्रमुख एसटी डेपोमनधून सुटणार्‍या एसटीचे वेळापत्रक अशा माहिती देण्याचा सपाटा एसटी महामंडळाने लावला होता. अखेर शुक्रवारला एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करत संप करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा १२ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे.

    संपामुळे दररोज १५ ते २0 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा परिणाम महामंडळाला आणि परिणामी एसटी कर्मचार्‍यांना सहन करावा लागणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे. सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने संप मागे घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

    एकीकडे निवेदन जरी एसटी महामंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असले तरी आत्तापयर्ंत आंदोलन करणार्‍या २ हजारच्यावर एसटी कर्मचार्‍यांना निलंबित करत कठोर करावाई देखील महामंडळाने केली आहे. तर दुसरीकरडे चर्चेची दारं खुली आहेत असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही संपाला मनाई केली आहे. असं असले तरी एसटी महामंडळाचे हे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत.

----- (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code