अमरावती : सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यां मध्ये नवी उमेद निर्माण व्हावी या करिता अमरावती येथे दरवर्षी 'आम्ही सारे कार्यकर्ता' पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार बुलढाणा येथील डॉक्टर नंदकुमार व आरती पालवे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख एक लाख रुपये स्मृतिचिन्ह ,शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नामवंत शेतकरी आंदोलक व लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या सामाजिक कृतज्ञता निधीतुन दरवर्षी सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दरवर्षी जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने 'आम्ही सारे कार्यकर्ता' पुरस्कार देण्यात येतो. मागील वर्षी कोरोनाच्या थैमानामुळे पुरस्काराचा कार्यक्रम झालेला नव्हता. यंदा हा पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील मतिमंदांचे पुनर्वसन व देखभाल करणारे दाम्पत्य डॉ. नंदकुमार पालवे व आरती पालवे यांना जाहीर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून 74 महिला आणि 77 पुरुष अशा एकूण 151 मानसिक रुग्ण माता बांधवांना मानसिक आधार देऊन जगण्याचे बळ देण्यात येते. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शहरातील अभियंता भवन येथे दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश बाबा आमटे व जेष्ठ संपादक श्रीपाद अपराजीत यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जाणीव प्रतिष्ठानचे नितीन चौधरी, आशिष कडू, डॉ. हरिश बिंड, डॉ.मुकेश टापरे, सुधीर दरणे, डॉ. पराग सावरकर, राहुल तायडे, आकाश देशमुख, राहुल तायडे, रवींद्र मोरे, अली असगर कोवैतवाला, विद्या लाहे, सोनाली देवबाले ,प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या