Recent in Technology

Advertisement

Breaking News

खरे तेच खरे

  मीच मोठा सत्यवान
  म्हणती जगात सारे
  बळेच आव आणून
  नाचती जगात सारे
  झाकून सुर्य कधीच
  लपणार नाही बारे
  कुट्ट अंधारी तसेही
  चमकती हेच तारे
  अडवा किती तयाला
  बांधून भिंती न दारे
  उखडून फेकतांना
  दिसतात हेच वारे
  कांचन तेच कांचन
  करणे न लागे गोरे
  सोन्यात जीव पितळी
  रंगून मिळेल कारे
  असत्य भाषणातून
  बोंबला कितीही मारे
  बदलून जाणे नाही
  असे खरे तेच खरे
  -पी के पवार
  सोनाळा बुलढाणा
  ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code