मुंबई : ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरू होतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मास्क वापरणं गरजेचे आहे,असे सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा पाचपटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणार्या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केले जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील. मुंबईहून दिल्लीला जायचे असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचे असेल तरीही आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
0 टिप्पण्या