Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

महात्मा

    दिनदुबळ्यांच्या जखमेवर
    लावण्यासाठी मलम
    दुखऱ्याचे अश्रू पुसण्या
    हाती घेतली तुम्ही कलम
    मानव जातीच्या धर्माचे
    समजून गेले जेव्हा वर्म
    तेव्हाच तुम्ही निर्मिला
    सार्वजनिक सत्य धर्म
    स्त्रियांच्या अज्ञानाच्या
    जाणवल्या जेव्हा कळा
    तेव्हा तुम्ही चालू केली
    मुलींसाठी पहिली शाळा
    कोण शिकवणार मुलींना
    जाणवली तुम्हाला कमी
    सावित्रीला तयार करून
    मशाल पेटवण्याची हमी
    आज तुझ्या लेकींनी बाबा
    व्यापून काढले सारे क्षेत्र
    तुम्ही दिलेली शिकवण
    अन् वापरून महा अस्त्र
    शेतकऱ्यांचे दुःख वेदना
    संवेदना झाल्या आखूड
    गुलामीच्या तिव्र जाणिवेने
    चालवला तुम्ही आसूड
    पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code