Header Ads Widget

देशात महाराष्ट्र लसीकरणात दुसरे

    पुणे : देशात लसीकरणात महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. आतापयर्ंत ११ कोटी १९ लाख लस देत राज्य देशात क्रमांक दोनवर आहे, तर क्रमांक एकवर उत्तर प्रदेश आहे. तेथे आतापयर्ंत १५ कोटी ९४ लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. तिसर्‍या क्रमांकावर पश्‍चिम बंगाल असून तेथे ९ कोटी १५ लाख डोस देण्यात आले आहेत.

    देशात यंदाच्या १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले, तेव्हा सुरुवातीला डोस कमी मिळायचे. मात्र, नंतर डोसच्या लशींची संख्या वाढायला लागली आणि लसीकरणाचा टक्काही वाढला. आजमितीला राज्यात १0 हजार लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी ९0 टक्के केंद्र ही सरकारी तर १0 टक्के केंद्र ही खासगी आहेत. या सर्व केंद्रांवर दररोज सरासरी ७ ते ८ लाख जणांना लशीचा डोस मिळतो. त्यामध्ये १८ व त्यापुढील नागरिकांच्या लसीकरणाची संख्या अधिक आहे.

    आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत राज्यात ११ कोटी १९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी १२ लाख ९४ हजार आरोग्य कर्मचारी यांना पहिला तर ११ लाख ४१ हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच २१ लाख ४७ हजार फ्रंटलाइन वर्कर यांना पहिला तर, १८ लाख ९८ हजार जणांना दुसरा डोस मिळाला आहे.

    १८ ते ४0 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये ४ कोटी ७ लाख जणांना पहिला तर १ कोटी ७४ लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे. तर ४५ व त्यापुढील वयोगटातील २ कोटी ८९ लाख जणांना पहिला तर १ कोटी ८१ लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे.महाराष्ट्रात लसीकरणात मुंबई प्रथम क्रमांकावर असून, आतापयर्ंत येथे १ कोटी ६0 लाख ५६ हजार लसीकरण झालेले आहे. पुणे दुसर्‍या क्रमांकावर असून, येथे १ कोटी ३0 लाख डोस देण्यात आले आहेत. तिसर्‍या क्रमांकावर ठाणे असून तेथे ९३ लाख ६७ हजार डोस देण्यात आले आहेत. चौथ्या क्रमांकावर नाशिकमध्ये ५४ लाख ८ हजार आणि पाचव्या क्रमांकावर नागपूरमध्ये ५१ लाख ५७ हजार इतके लसीकरण झालेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या