Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रेम भाव...

    दिपावलीच्या शुभ पर्वावर
    लख्ख उजळाव्या दिशा
    जातीधर्माच्या भिंती पडाव्या
    भेदाभेदाने गुंडाळावा गाशा
    दिनदुबळ्यांचे नशिब फळावे
    उतरावी अत्याचारी नशा
    आपसातील मतभेद मिटावे
    संपावी धूर धुक्यांची निशा
    कृध्द विखारी भाषणांच्या
    तलवारीही व्हाव्यात म्यान
    शांत संयमी भारतवर्षाच्या
    पदरी पडावेत हेचि दान
    भ्रष्ट खेळत्या जुगारातून
    रयतेचीही सुटका व्हावी
    मार्ग चुकलेल्या पामरांना
    सत्याचीही वाट दिसावी
    गटातटाचे वदणे वर्जून
    एकात्मतेचे दर्शन व्हावे
    सप्तसुरांच्या मैफिलीतून
    अखंडतेचेही गाणे गावे
    विविधतेने नटलेल्या देशा
    अमंगळाची दिट ना लागो
    या मातीच्या कणाकणातून
    प्रांजळ प्रेमाचे भाव जागो
    -पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code