Recent in Technology

Advertisement

Breaking News

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

    नव्या व्हेरियंटचा धोका : राज्य सरकारकडून नवी नियमावली

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढणार्‍या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झाले आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे.

    केंद्र सरकारने याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणार्‍या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असे केंद्राने कळवले आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    कोरोनाचा जोर ओसरत असतानाच आता नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनची लागण जगभरात सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नवीन नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. नव्या व्हेरियंटमुळे सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. कोरोना प्रतिबंधनासाठीचे नियम हे ग्राहक, प्रवासी, सेवा पुरवठादार आदींसाठी बंधनकारक असतील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code