मुंबई : तारत मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सर्वांनाच आवडते. कित्येक वर्षांपासून लोक ही मालिका पाहत आहे. यातील प्रत्येक कलाकार लोकांच्या मनात बसलेले आहे. त्यामुळे ते बदलत नाही तसेच कलाकाहरी मालिका सोडून जात नाही. प्रत्येकाची चाहत्यांच्या मनात वेगळी आणि चांगली ओळख निर्माण झाली आहे. मात्र, या मालिकेला नवीन नट्टू काका मिळाले आहे. ते लवकरच मालिकेत दिसून येतील.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. २00८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. दयाबेन आणि जेठालाल, तारक मेहता आणि जेठालाल, भिडे आणि माधवी बेहन यांची जोडी जशी प्रसिद्ध आहे तशीच जेठालाल आणि नट्टू यांची जोडी सुद्धा मालिकेत चांगलीच प्रसिद्ध आहे.
मात्र, काही महिन्यांपूर्वीच नट्टू काका म्हणजे धनश्याम नायक यांचे निधन झाले. त्यामुळे मालिकेत त्यांची जागा कोण घेणार, अशी चर्चा सुरू झाली. अशातच सोशल मीडियावर नवीन नट्टू काका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर असलेल्या एका अकाऊंटवर नवीन नट्टू काकाचे फोटो व्हायरल होत आहेत. यामुळे लवकरच नवीन नट्टू काका मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.मालिकेत नवीन नट्टू काका येणार असल्याचा फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो बनावट आहे की खरा हे मात्र सांगता येणार नाही. कारण, मालिकेत नवीन नट्टू काका येणार असल्याचे निर्मात्यांच्या वतीने सांगण्यात आलेले नाही. ऑक्टोबर महिन्यात नट्टू काका म्हणजे धनश्याम नायक यांचे कर्करोगाने निधन झाले होते. ते २00८ पासून मालिकेशी जुळलेले होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या