Header Ads Widget

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

    अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

    विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसीलदार वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, नाझर अतुल पेठे, स्वीय सहायक अतुल बुटे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुभाष दळवी, अधिक्षक उमेश खोडके, तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या