पुरुषही हळवा असते
सासरी जाणाऱ्या लेकीसाठी
त्याचंही काळीज रडते...
नाही दिसला मुलगा घरी
वाट तोही आतुरतेने बघतो
आयुष्यभर खास्ता खावून
फक्त पोरांचा विचार करतो....
कितीही भांडला बायकोशी
तरी प्रेम मनापासून करतो
पापणीच्या आड जाताच ती
कौतुकाचे मोती पेरतो....
दिवसरात्र कष्ट उपसून
वैशाखाच्या झळा सोसत राहतो
वादळवारे अंगावर झेलून
कुटूंबासाठी जगत राहतो....
पुरुषांनाही असतात मन भावना
पाझरते मन काही क्षणाला
ओलावतात त्याच्याही पापण्या
पण नाही दाखविता येत जगाला....
त्याच्या हृदयाचा हळवा हुंदका
पुसावा मायेच्या पदरानी
स्वतःचे दुःख कुरवाळतांना
त्याचेही अश्रू पुसा प्रेमानी....
सौ निशा खापरे
नागपूर
0 टिप्पण्या