Header Ads Widget

एसटीचा संप उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेला नाही

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप आणखी तीव्र होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संपाचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर ठरवला असल्याचे म्हटले होते. याला विधिज्ञ गुणर% सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिले असून, एसटी कर्मचार्‍यांचा संप मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेला नाही, असे म्हटले आहे.

    संप करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. अनिल परब यांचा खोटारपडेपणा सुरु आहे. आदित्य ठाकरे यांच्यासारख्या युवा मंत्र्याने यामध्ये लक्ष घालावे, असे गुणर% सदावर्ते यांनी म्हटले आहे. एक मंत्री म्हणून अनिल परब तुमच्याकडून चुकीची माहिती पसरवण्याची अपेक्षा नाही, असा टोलाही सदावर्ते यांनी लगावला आहे.

    मंत्री आदित्य ठाकरे यांनी समोर आले पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मला असे वाटते की, मुख्यमंत्री याबाबत कॉल घेतील आणि योग्य चर्चा करून योग्य ते न्यायलयात मांडतील, अशी अपेक्षा सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे. तसेच पगाराचा, एरियर्स किंवा केलेल्या कामाचे पैसे मिळाले, तर ती मेहरबानी नाही. ते आमच्या हक्काचे पैसे आहेत. एसटी कर्मचा?्यांची प्रमुख मागणी विलीनीकरणाची आहे. अनिल परब तुम्ही या मागणीचा काहीच विचार केला नाही.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या