Recent in Technology

Advertisement

Breaking News

पणती

  एक पणती माझ्या हाती
  एक पणती तुझ्या हाती
  चला उजळूया रे आपण
  दिन दुबळ्यांच्या रे राती !!
  उंच उंच चढवू या
  दिवा, कंदिल आकाशी
  लावू बन्धुत्वाची ज्योत
  वैर नकोच कुणाशी !!
  पणती पेटऊ हृदयी
  देशप्रेम एकतेची
  ईमानाचे तेल घालू
  लावू वात समतेची !!
  एक पनती पेटऊ
  माझ्या रे बळीराजाची
  सुख समृद्धि येऊ दे
  घड़ी येऊ दे आनंदाची !!
  घरोघरी पेटवावी
  ज्योत वीर शहीदांची
  ज्योतिस ज्योत मिळू द्या
  वाट मिळो रे मुक्तिची !!
  सारा प्रकाश प्रकाश
  चंद्र तारे माझे दारी
  नाश होओ तिमिराचा
  सुख नांदो घरोघरी !!
  वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
  अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code