Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दीनबंधू..…

करणार कोण । गरिबांची तमा ।
धन केले जमा । श्रीमंतांनी ।।

गुलाम बनून । शेतात राबतो ।
यातना सोसतो । दीनबंधू ।।

नशिबी गुलामी । वस्त्र फाटलेले ।
डोळे भरलेले । आसवांनी ।।

कोणी दिसतात । विटभट्टीवर ।
तीनही प्रहर । कष्टताना ।।

लेकरे सोबत । शिक्षण खंडित ।
जपणार हित । कोण त्यांचे? ।।

एकीकडे घट्ट । प्रकाश दिसतो ।
गरीब झोपतो । अंधारात ।।

झोपडी येऊन । कोण बघणार? ।
कोण पुसणार । आसवांना? ।।

त्यांनापण जाणा । माणसाप्रमाणे ।
जगवा सुखाने । त्यांना जरा ।।

अजुची विनंती । माझ्या बांधवांना ।
करा गरिबांना । साह्य जरा ।।

-अजय रमेश चव्हाण, 
तरनोळी, ता.दारव्हा, 
जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code