संविधान देतो नागरिकांना
सार्वभौम समाजवादाचे धडे
लोकशाही गणराज्य घडवण्याचे
वाचायला लावतो पाढे
सामाजिक आर्थिक न्यायाची
विचार अभिव्यक्तीची देतो हमी
विश्र्वास श्रद्धा आणि उपासना
याची कुठेच राहू नये कमी
निर्भय राहून स्वातंत्र दर्जाची
असावी अखंड देशात समानता
प्रतिष्ठेतूनही निर्माण व्हावी
राष्ट्राची एकता आणि एकात्मता
आश्वासनांची पूर्तता व्हावी
बंधू भावाचेही चढावे किल्ले
हक्क आणि अधिकार कळावे
हे आम्हाला संविधानाने शिकविले
जातपात पंथ धर्म भेदाच्या
विविधतेने घ्यावे वळन समान
शोभून दिसावी प्रारंभीच
संविधानानाची तेजस्वी कमान
चला करुयात आज निर्धार
करुन संविधानाचे वाचन
बलवान बलशाली भारत
बनवू आज देऊयात वचन
____________________________
____________________________
पी के पवार
सोनाळा ता संग्रामपूर जि बुलढाणा
९४२१४९०७३१
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या