Recent in Technology

Advertisement

Breaking News

बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित

* लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार 

अमरावती :  माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी देशाच्या सार्वजनिक बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बैंक असलेली बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) यांच्या दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गट (SHG) व संयुक्त दायित्व गट (JLG) यांना कर्जपुरवठा करण्याकारिता आर्थिक सामंजस्य करार मा. ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर, मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अमरावती जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे करण्यात आला.

            महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाची शिखर संस्था महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोक संचालित साधन केंद्र स्थापित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्याकरीता सदैव प्रयत्नशील असते. त्यामुलेच बँकेनी पुढाकार घेऊन माविम बचत गटांच्या महिलांना उद्योगशील बनविण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्ज पुरवठा त्वरित व्हावा या करीता बैंक ऑफ महाराष्ट्र व माविम अमरावती स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सावित्रीबाई फुले CMRC चांदूर बाजार, दिशा CMRC चांदूर रेल्वे, जिजाऊ CMRC, दर्यापुर, झेप CMRC मोर्शी, भरारी CMRC धामनगाव रेल्वे, परिवर्तन CMRC भातकुली, प्रेरणा CMRC जरुड, विमलाबाई देशमुख CMRC लोणी टाकली, मेलघाट CMRC धारणी, संजीवनी CMRC अंजनगाव सुर्जी, उन्नती CMRC अचलपुर, सावित्रीबाई फुले CMRC वरुड व संत तुकड़ोजी महाराज CMRC माहुली जहाँगीर या 13 लोक संचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटांना या कराराचा लाभ होणार आहे. आज झालेल्या MoU  कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र चे अमरावती अंचल प्रबन्धक श्री राहुल वाघमारे, उप अंचल प्रबन्धक श्री अनिल गिरसावले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री सुनिल सोसे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी श्री. ऋषिकेश घ्यार व CMRC व्यवस्थापक व सहयोगिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code