धागा हा मैत्रीचा
सुखाचा शांतीचा
प्रेम जिव्हाळ्याचा
ख-या जीवनाचा !!
धागा हा मैत्रीचा
जीव लावण्याचा
मैत्रीसाठी पुढे
पुढे धावण्याचा !!
मैत्री विश्वासाची
भाव भावनांची
धागा हा मैत्रीचा
ओढ ही मनाची !!
नको हेवा दावा
नको ते रुसवे
हास्य हे फुलावे
मन ही हसावे !!
धागा हा मैत्रीचा
प्रेमाचा घेऊया
सुंदर रेशमी
विण ही विणुया !!
धर्म पंथ जात
नको त्यात काही
सर्व आपुलेच
हीच इच्छा राही !!
- हर्षा वाघमारे
नागपूर
0 टिप्पण्या