Header Ads Widget

आई

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
आई कुठे शोधू तुला
आज नाहीस तु घरी !!

क्षणात केलेस पोरके
सांगावे दुःख कुणाला
कुशी नाही तुझी, 
नाही पदर रडायला !!

जग हे विशाल सर्व,
आहेत नाती गोती
पण,पत्येक क्षणाला
नयनी आसवे दाटती !!

तुझ्या आठवणीत आई
दिवस रात्र निघून जाते
तुझ्या संस्कारांचे मी,
पालन आवर्जून करते !!

तू जिथे कुठे असशील
 बघतेस कां ग माझ्याकडे 
तुझ्या आशीर्वादाची गरज  
सतत मला आहे गडे !!

आई सारखे दैवत ज्याला
लाभेल भाग्य त्याला खरे
नसते आई जेव्हा, सोबतीला
कळते तिची किंमत बरे !!

- हर्षा वाघमारे
नागपूर ✍️
९९२३८१९७५२

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर 👌👌 👍
Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर 👌👌👍