अबोल मुखातील
स्वर गुंज उठावे
गाऊनी गीत प्रिये
कंठी राग लुटावे
अक्षय भावनांचा
मर्म तुला कळावे
साकल्य मन माझे
मनोहर फुलावे
अवखळ मनाचे
क्लेश तू जाणावे
प्रीतीचा गुलकंद
हृदयात रुजावे
आठवणींचा रवंद
सांग किती जपावे
ओढल्या या जखमा
कुठवरी सोसावे
-सुभाष जीवा राठोड (कलाशिक्षक)
दीपचंद चौधरी विद्यालय सेलू जिल्हा वर्धा मो.९८२२७०२९७५
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या