कृषी वैज्ञानिक चयन मंडळ, कृषी अनुसंधान एवं शिक्षा विभाग पुसा नवी दिल्ली यांनी घेतलेल्या नेट परीक्षेमध्ये प्रा.मोहिनी राजेंद्र पुनसे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
प्राध्यापक पदाकरिता आवश्यक असलेली पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा त्यांनी कृषी विद्या (अग्रोनोमी) या विषयात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.त्या सध्या श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथे विद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडीलासह गुरुजनवर्ग यांना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या