- पिंपळखुटा/स्वाती इंगळे
कृषी वैज्ञानिक चयन मंडळ, कृषी अनुसंधान एवं शिक्षा विभाग पुसा नवी दिल्ली यांनी घेतलेल्या नेट परीक्षेमध्ये आनंद नागसेन वरघट यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
प्राध्यापक पदाकरिता आवश्यक असलेली पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा त्यांनी कृषी किटकशास्त्र या विषयात उत्तीर्ण केली आहे.
आनंद वरघट सध्या नैनी कृषि महाविद्यालय, SHUATS, प्रयागराज ,उत्तर प्रदेश येथे कृषी किटकशास्त्र या विषयात संशोधन (PHD) करित आहे.त्यांचे संशोधन कृषी कीटकशास्त्र कृषी पिकांमधील कीटक व्यवस्थापन आणि निदानाशी संबंधित आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील,गुरुवर्य,PHD मार्गदर्शक यांना दिले आहे.यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 टिप्पण्या