Recent in Technology

Advertisement

Breaking News

विदूषक...

    दुःख मनात ठेवून
    हसवतो दुसऱ्यांना ।
    विदूषक एकमात्र
    सुखवतो प्रत्येकांना ।।
    कोणी पाहलेच नाही
    नाही विचारले त्यांना ।
    दुःख कशाचा असेल
    सुख जना देणाऱ्यांना ।।
    जरा विचारून बघा
    त्यांच्या मनीच्या वेदना ।
    जीवनात काय आहे
    त्यांच्या मनीच्या कामना ।।
    करतब दावणारा
    खरा खेळाडू असतो ।
    पडद्याच्या मागे बघा
    कसा शेवटी रडतो ।।
    कधी हसवा त्यांनाही
    त्यांना साह्य करुनिया ।
    विदूषक जगणार
    ऋणामध्ये राहूनिया ।।
    -अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी ता.दारव्हा, जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code