अमरावती : भातकुली तालुक्यातील तब्बल 17 गावांत 100 टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले. सर्वधर्मिय बांधवांचा लसीकरणात मोठा प्रतिसाद असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय निकोसे यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विभागांच्या सहकार्याने आरोग्य पथके जिल्ह्यात सर्वदूर कार्यरत आहेत. भातकुली तालुक्यात 99 गावे असून एकूण तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक गावागावांत प्रभावी जनजागृती, घरोघर भेटी यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील 13 गावांत, तर आष्टी पीएचसीतील 4 गावांनी कोविड लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरणासाठी सर्वधर्मिय बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे.
अंचलवाडी,पोहरा पूर्णा, दर्याबाद, जळतापूर, खारतळेगांव, बोरखडी बु.,बोरखडी खु., बुधागड, सावरखेडा,तंतरापूर, झांजी, निंदोडी,नवथळ, उदापुर,अंतापुर,अळवी, विरशी या गावांमध्ये तब्बल शंभर टक्के लसीकरण झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र उपलवार यांच्यासह त्यांच्या सर्व सहका-यांनी योगदान दिले. गावातील प्रत्येक नागरिकाने लस घेऊन स्वतः व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या