Header Ads Widget

१0 कोटी लसीकरणाचा टप्पा महाराष्ट्राने गाठला

    मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने कोरोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा देखील गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

    महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्हय़ात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचार्‍यांच्या अथक पर्शिमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो. असं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले अभियान' राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.याचबरोबर कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी देशाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १00 कोटींचा आकडा पार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या