आज दि.२६ नोव्हेंबर,२०२१ ला असलेल्या “संविधान दिना”निमित्त कवी प्रा.अरुण बा.बुंदेले लिखित “संविधान दिन” ही अभंगरचना वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.-संपादक
Contents hide
- सव्वीस तारीख। नोव्हेंबर मास।
- संविधान दिन। आनंदाचा॥१॥
- घटनेचा आज। स्वीकाराचा दिन।
- सजला हा साज । भारतात॥२॥
- भीम लेखणीने । स्वातंत्र्य समता।
- न्याय नि बंधुता। घटनेत॥३॥
- संविधान हाच। सर्वोच्च कायदा।
- सर्वांचा फायदा। भारतात॥४॥
- जगी भारतात। बहु विविधता।
- जपते एकता। संविधान ॥५॥
- संस्कृती सन्मान। वंचित संतोष।
- करू जयघोष । संविधान ॥६॥
- संविधान रक्षा। करुनिया सारे।
- आनंदाचे वारे। भारतात॥७॥
- संविधान दिन। थोरांची ही देणं।
- करू या स्मरण। विभुतींचे॥८॥
- राज्यघटनेचे। शिल्पकार एक
- युगप्रवर्तक । भीमराव ॥९॥
- बाबासाहेबांना। करितो नमन।
- करांनी वंदन । कोटी कोटी॥१०॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर ,अमरावती
- ४४४६०६ (महाराष्ट्र).
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.
- Email ID :-arunbundele1@gmail.com