श्री संत शंकर महाराज कला महाविद्यालयात सविधान दिन संपन्न

    श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष मुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विजय कामडी संतोषचंद्र नागपुरे उपस्थित होते.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विचारपीठावरील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.भारतीय संविधान दिनाच्या पर्वावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नरेश इंगळे यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले तदनंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विजय कामडी यांनी भारतीय राज्यघटना या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.

    तसेच डॉ.सुभाष मुरे यांनी अखंड भारतासाठी भारतीय संविधान कसे उपयुक्त आहे यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.नरेश इंगळे यांनी तर उपस्थितीचे आभार डॉ.मेघा सावरकर यांनी मानलेत.कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.