* “राज्यपाल म्हणाले“आश्रमात निवांतपणे पुन्हा येईल”
गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य लढयाचे स्फुलिंग चेतविले 1942 च्या स्वतंत्र्य लढयात आष्टि,चिमुर,यावली शहीद,चंद्रपुर येथे ब्रिटीश राजवाटीच्या विरोधात राष्ट्रसंतानी बंड पुकारल्यामुळे पुढे देश स्वतंत्र्य झाला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुकुंज आश्रम येथे आज केले.
राज्यपाल कोश्यारी यांनी प्रयाग येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत त्यांच्या झालेल्या भेटीचा प्रसंगातील किस्सा सांगुन आपण “ मै हु उत्तराखंड का मगर तुकडोजीके कार्य के बारे मै बहूत अछी तरह परीचित हू राष्ट्रसंतजीको कौन नही जाणता यह पुछीये उनसे 1966 मे मै मिला हु ”असा संवाद राज्यपालांनी गुरुकुंजात केला. सर्वप्रथम राज्यपाल यांनी राष्ट्रसंताच्या महासमाधीला आदरांजली अर्पण केली यासाठी त्यांनी स्वत:नागपुर येथुन आकर्षक पुष्पाहार आणला होता.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जर्नादनपंत बोथे यांनी राष्ट्रसंतांचा गुरुकुंज आश्रम स्थापनेमागचा उद्देश,आश्रमीय उपक्रम,प्रचारीय कार्याची माहीती, संस्थेचा 2020 ते 2021 चा कार्य अहवाल राज्यपालांना दिला.त्यानंतर राज्यपालांनी सर्वधर्म प्रार्थना मंदीरातील आदरांजली अर्पण केली. राज्यपालांना ग्रामगीता,मेरी जापान यात्रा ग्रंथासह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य व पद्य रचना असलेला समग्र साहीत्याचा संच सरचिटणीस जर्नादनपंत बोथे यांनी संस्थेच्यावतीने भेट दिला. राज्यपालांच्या भेटीसाठी रात्रीपासुन राजभवन मधील अधीकारी गुरुकुंज आश्रमीय कार्यालयासोबत संपर्करत होते.
राजभवन येथे गेल्यावर सर्व साहीत्याचे वाचन व मनन करुन एकदा परत एक दिवस गुरुकुंजात मुक्काम करण्यासाठी पुन्हा लवकरच येईल.यहाका सुकुन कुछ औरही है असे ते यावेळी म्हणाले. गुरुकुंजाती सर्वतिर्थ अस्थिकुंडाबाबत कुतुहल दाखवित माहीती जाणुन घेतली. या सर्वतिर्थ अस्थिकुंडात दररोज पहाटे अस्थिंचे विसर्ज केले जाते. राज्यपालांसोबत यावेळी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी दिघडे,श्रीगुरुदेव आरोग्य विश्वस्त प्रमुख डॉ पाळेकर,अमरावतीचे महापौर चेतन गांवडे,माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे, श्रीगुरुदेव अध्यात्म विभागप्रमुख डॉ राजाराम बोथे,भाजपा सरचिटणीस प्रविण तायडे,प्रविण शेगोकार,शंतनु देशमुख,निलेश श्रीखंडे ,राजेश पाठक व आश्रमीय सेवकवर्ग व गावकरी उपस्थित होते.