• Fri. Jun 9th, 2023

राज्यात ६३ आगारातील वाहतूक ठप्प

    मुंबई : वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सुरू असलेला संप अद्यापही सुरू आहे. शनिवारी दुपारी ४ वाजेपयर्ंत राज्यातील २५0 एसटी आगारांपैकी ६३ आगारातील वाहतूक ठप्प होती. संपाचा सर्वाधिक प्रभाव औरंगाबाद विभागात दिसून आला. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील ४७ पैकी ३0 आगार बंद होते.

    एसटी कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला संमिर्श प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद, नागपूर विभागीय प्रदेशात संपाचा जोर असल्याचे सूत्रांनी म्हटले. नागपूर विभाग प्रदेशातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील २६ पैकी १७ आगारातील वाहतूक ठप्प आहे. मुंबई विभाग प्रदेशात एसटीची वाहतूक सुरळीत होती. मुंबई, पालघर, रायगड, र%ागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे या जिल्ह्यातील सर्व ४५ आगारातून एसटी वाहतूक सुरळीत सुरू होती. एसटीच्या पुणे विभाग प्रदेशातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील ५५ पैकी फक्त ५ आगारातील वाहतूक बंद होती. तर, ५0 आगारातून वाहतूक सुरळीत सुरू होती. नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील ४४ आगारांपैकी फक्त चार आगारातील वाहतूक बंद होती. दरम्यान एसटी कामगारांच्या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या १0 नोव्हेंबर रोजी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला आहे.


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *