• Sun. May 28th, 2023

मुख्याध्यापक श्री बाबुराव शेळके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप व सत्कार समारंभ संपन्न

    भानखेड बु.येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या व्यायामशाळेचे उद्घाटन

    अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल,भानखेडा बु. येथील मुख्याध्यापक श्री बाबुरावजी पुं शेळके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त दि.30/10/2021 रोजी सत्कार व निरोप समारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला तसेच श्री शिवाजी हायस्कूल,भानखेडा बु. या शाळेत नव्यानेच बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटनमान्यवरांच्या हस्ते झाले.

    या निरोप व सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष मा.श्री नरेशचंद्रजी ठाकरे , उद्घाटक श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री दिलीपबाबू इंगोले, प्रमुख अतिथी मा.ॲड. श्री गजाननराव पुंडकर (उपाध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती),मा.श्री हेमंतराव काळमेघ,(सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती,मा.प्राचार्य श्री केशवराव गावंडे, सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती.),मा.श्री केशवराव मेतकर,(सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती),मा.सौ वनिताताई ठाकरे,(सरपंच,ग्रामपंचायत, भानखेडा बु.),मा.श्री नरेश पाटील,(स्वीकृत सदस्य,श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री शिवाजी हायस्कूल भानखेडा बु.चे शाळा समिती अध्यक्ष व आजीवन सभासद ॲड. श्री अशोकराव गावंडे होते.

    सर्वप्रथम सत्कार सोहळ्याचे उद्घाटक मा. श्री दिलीपबाबुजी इंगोले व मान्यवरांनी व्यायाम शाळा हॉलचे उद्घाटन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि स्वर्गीय डॉ. आर. डी. ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीप प्रज्वलन केले . स्वर्गीय न्यायाधीश ॲड. श्री अशोकराव ठुसे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद स्वर्गीय श्री भुजंगराव ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    स्वागतगीताने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच गुलाबपुष्प व भाऊसाहेबांचे स्मृतिचिन्ह देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावरील ‘भाऊसाहेब’ या शीर्षकाचे स्वरचित वंदन गीत सुप्रसिद्ध कवी प्रा.अरुण बा.बुंदेले यांनी सुमधुर स्वरामध्ये गाऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका कु. एस.ओ.धवने मॅडम यांनी केले.कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबूजी इंगोले यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतातून मा.श्री नरेशचंद्रजी ठाकरे यांनी,सत्करमुर्ती श्री शेळके सर यांनी आदर्श विद्यार्थी घडविले व शाळा विकासासाठी प्रयत्न केले .शिक्षकांनी त्यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करून नवीन पिढी घडवावी, असे विचार व्यक्त केले.व श्री बाबुरावजी शेळके यांना पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. सत्कारमुर्ती श्री बाबुरावजी शेळके यांनी सत्काराला उत्तर दिले.

    याप्रसंगी मा.अशोकराव गावंडे,मा.केशवराव मेतकर, केशवराव गावंडे,मा. हेमंतराव काळमेघ मा. गजाननराव पुंडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्री अतुल ठाकरे तर आभार प्रदर्शन श्री पी.पी.ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाला सर्वश्री स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, प्रा.अंबादास वाटाणे, दिवाकरराव देशमुख, सुरेंद्र जीवनराव देशमुख, आर.जी.किटुकले, रमेशराव धांडे, बाबासाहेब मोहोड, आर.बी.काळे, दादाराव हुशंगाबादे, दिनकरराव जायले, प्रकाशराव गावंडे,प्राचार्य भा.वा. चौखंडे , भैय्यासाहेब मेटकर,उपमुख्याध्यापक माळवे सर,सहा. शिक्षक यशपाल वरठे,प्रा. अरूण बुंदेले,राजाभाऊ सु्ंदरकर ,विजय डहाके,प्रा. नामदेव भगत, मंगळे सर,पर्यवेक्षक शाम वाटाणे, ॲड.अशोकराव गावंडे इत्यादी आजीवन सभासद व मान्यवर उपस्थित होते.या निरोप व सत्कार समारंभाची सांगता स्वरुची भोजनाने झाली.


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *