• Tue. Jun 6th, 2023

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!

  महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतवासीयांना मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ -संविधान हा आपल्या खडतर प्रवास आणि प्रदीर्घ लेखणीतून बहाल केला आहे* सन 2015 सालापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो. ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. हा मानवी जीवन कल्याणाचा दिवस आहे. भारतात हजारो ग्रंथ असताना दीन-दलित, भटके विमुक्त, आदिवासी दीनदुबळे लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान होय. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी होऊन त्यामध्ये आठ महत्त्वाच्या समित्या बनवल्या. त्यामध्ये *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती देण्यात आली.* 29 ऑगस्ट 1947 रोजी समिती गठित करण्यात आली.

  मसुदा समितीकडे आलेल्या सर्व दस्तऐवजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास करून घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये बनवला. हा मसुदा सरकारने छापला .आणि प्रसिद्ध केल्यानंतर देशभर चर्चा झाली. अभ्यासकांनी लेख लिहिले. सेमिनार झाली. आलेली माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. आणि त्यात सर्व बाबीचा अभ्यास करून ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा तयार झाला. आणि तोही सरकारने छापला.यावरही उलट-सुलट लेख लिहिल्या गेले .देशभर चर्चा रंगली. परिषदा, सेमीनार झाली. सरकारने आलेल्या सुचना, टिका हे सर्व गोळा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिल्या.

  डॉक्टर बाबासाहेबांनी या सर्व टीकेचा अभ्यास करून राज्यघटनेचा तिसरा मसुदा तयार केला. हा मसुदा नोव्हेंबर 1948 मध्ये घटना समितीसमोर मांडला. यावर वर्षभर चर्चा झाली. शेकडो दुरुस्त्या सुचवल्या. अटीतटीची चर्चा झाली .आणि काही गोष्टी स्वीकारून “घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली.यावर 284 सभासदांनी सह्या केलेल्या आहेत. घटना समितीने एकूण 166 दिवस काम केले. घटना तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. या कामासाठी सुमारे 60 लाख रुपये खर्च झाले. खडतर प्रवासातून प्रदीर्घ अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण घटना जी जगात श्रेष्ठ आहे”. ती 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतात लागू करण्यात आली म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून फार मोठ्या प्रमाणात साजरा करतो.
  एका प्रतिभावंत कवीने व्हाट्सअप वर नाव न टाकता फार सुंदर कविता लिहिलेली आहे.

  तू म्हणतोस ना?
  संविधान तुझं आहे,
  बर ठीक आहे,
  माझं तर माझं..
  पण माझ्या संविधानात,
  तुला ही मान आहे,
  पण तुझ्या धर्मग्रंथात,
  मला कुठे स्थान आहे??

  खरंच 135 कोटी लोकसंख्या असलेल्या या भारतवर्षात हजारो वर्षापासून तमाम बहुजनांना कुठे न्याय, अधिकार, हक्क मिळाला आहे? *कोणत्या धर्मग्रंथाने या दिन दुबळ्या, आदिवासी, विमुक्त भटके, लोकांना सन्मानाने जगू दिले हो?… जनावरांना पाणी पिण्यास मनाई नव्हती. पण माणसानीं पाणी ला स्पर्श केला तर विटाळ मानला जायचा* *सन्मानाने जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता .तो अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपणास दिला आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानव कल्याणाचे महानायक ठरले आहेत* कुणीतरी फार सुंदर गाणे लिहिले आहे. त्याचे नाव मला आठवत नाही.

  आम्ही खातो त्या भाकरीवर….
  बाबासाहेबाची सही हाय रं…….
  आम्ही खातो त्या भाकरीवर…..
  बाबासाहेबांची सही आहे रं.।
  खरंच त्या भाकरी ची किंमत संविधानाने आज आम्हाला कळली आहे .कवी पुढे लिहितो………………..
  मंदिर तुझं, देव तुझा,
  आणि पुजारी तुझाचं,
  माझं फक्त पेटीत दान आहे.

  आज संविधानाने सर्वाधिकार मिळाल्यानंतरही कोण्या एखाद्या देवळात बहुजनाचा पुजारी दिसतो का? बिलकुल नाही……(विचार करा बहुजनांनो) महाराच्या घरात महार, मांगाच्या घरात पोतराज मागं, चांभाराच्या घरात चांभार ,भंगीच्या घरात भंगी, कुंभाराच्या घरात कुंभार ,नाव्हीच्या घरात नाव्ही जन्म घ्यायचा.*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे महार, मांग, चांभार, कुंभार, भंगी ,ब्राह्मण, तेली तांबोळी ,साळी ,माळी ,कोळी, लोहार, सुतार ,धनगर ,बंजारी, बंजारी ,भटके-विमुक्त ,आदिवासी, कातकरी ,अठरापगड शूद्रातिशूद्र जातीच्या घरात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक,प्राध्यापक, लेखापाल ,रोखपाल ,आयपीएस आयएएस ,वकील ,न्यायाधीश, मॅनेजर ,उद्योजक ,शास्त्रज्ञ , आमदार ,खासदार ,मंत्री होऊन राहिले .एवढेच नव्हे तर चुल आणि मूल सांभाळणारी बाई आज संविधानाने देशाचे सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली आहे .ही आहे संविधानाची खरी ताकद.* कवी पुढे म्हणतो-

  तुझ्या त्या ग्रंथात…………
  कुत्र्याला भाकर,
  आणि मुंगीला साखर,
  सापाला दूध ,
  आणि माणसाला गाईचा मुत,*
  कुठे आहे रे,
  माणसाची जाण…..?

  एवढा माणूस निकामी केला. या धर्मग्रंथांनी आणि माणूस म्हणून ताठ मानेने जगण्याचे सर्व मार्ग या मनुवादी ग्रंथाने नाकारलेली असताना. *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अंधारात चाचपडणाऱ्या तमाम बहुजनांना मुक्तीचा ,जनकल्याणांचा मार्ग दाखवुन काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवला. डोंगरदर्‍यात, झोपडीत राहणारा बहुजन बांधव टोलेजंग इमारती मध्ये एसीमध्ये ढोलक्या घेतो. अंगाला फाटका कपडा गुंडाळणारा सुटा बुटात महागड्या गाड्यातून भारतभर भ्रमण करतो .ही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची खरी ताकद.* तरीही काही मनुवादी मंडळी संविधान बदलण्याची भाषा बोलते. त्याचा मी जाहीर निषेध करतो. संविधान बदलले जाऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर आहे– हो .पण संविधानात दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. मात्र ते संपूर्ण बदलले जाऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. *संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये घटना दुरुस्तीचे समर्थन केले होते. दुरुस्तीची प्रक्रिया घटनेच्या 368 अनुच्छेदा मध्ये नमूद केली आहे. हा अधिकार संसदेला असला तरी संसदेकडे कितीही बहुमताची ताकद असली .तरी घटनेचा मूलभूत ढाचा (बेसिक स्ट्रक्चर) तिला बदलवता येणार नाही.असा दंडक 1973 च्या केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला आहे.

  संविधानातील सर्वोच्चता, देशाची एकता व सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणतंत्रात्मक राज्यपद्धती, संघराज्य रचना, धर्मनिरपेक्षता, व्यक्तिस्वातंत्र्य,संसदीय प्रणाली, कायद्याचे राज्य, समतेचे तत्व, मूलभूत अधिकार ,आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक अप्रतिम सूत्रे याचा सौहार्द आणि समतोल असल्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही.म्हणून संविधान बदलू पाहणाऱ्याच्यां थोबाडीत कवी आपल्या खालील अप्रतिम ओळीत एक झापड लंगावतो आहे.

  तुझी ती
  निचं संकुचित मानसिकता,
  कधीच बदलत का नाहीस रे,
  आणि मग,
  गटारातून बाहेर यावी घाण,
  तसा तुझ्या मनातल्या,
  जळंफळाटाचा उद्रेक होतो,
  आणि तू
  संविधान बदलण्याची,
  भाषा बोलतो……
  संविधान बदलण्याची …
  भाषा बोलतो…

  घरात कोणतेही पुस्तक नसले तरी चालेल .घरात संविधान असणे गरजेचे नाही तर मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.*सर्व भारतीयांना संविधान दिवसाच्या मनभर शुभेच्छा!

  जय भीम….. जय संविधान !
  -याडीकार पंजाब चव्हाण
  पुसद
  व्हाट्सअप नंबर 94 21 77 43 72

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *