मध केंद्र योजनेसाठी अर्जाचे आवाहन

    अमरावती : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनासाठी सहाय्य देण्यात येते. योजनेत वैयक्तिक मधपाळ या घटकासाठी अर्जदार साक्षर व 18 वर्षे वयावरील असावा. शेती असल्यास प्राधान्य मिळेल. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकासाठी व्यक्ती 21 वर्षापेक्षा जास्त व दहावी उत्तीर्ण हवी. व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावरील शेतजमीन असावी, तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

    संस्था या घटकासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेची किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती दूरध्वनी क्र. 0721-2662762 यांच्याशी संपर्क साधावा.


—–