भाऊबीज कोमेजली…!

    वर्षानुवर्षे येणारी दीप दिपावली
    आजच्या वर्षी दीनवाणी झाली
    कोरोनाने सार्याची वाट लावली
    हर्ष उल्हासात येणारी भाऊबीज
    सुकल्या नेत्रातच कोमेजली. …१ …
    बहारदार पेहराव शरीर आडदांड
    बघता बघता जळून गेला पिंड
    भाऊ बहिणींचं बंधन संपवून रात गेली
    नियतीला नाही भाऊबीज समजली
    मम ममतेची पाखर मनातच कोमेजली. .२ ..
    भाऊ माझा पाठीराखा आधार जन्मभराचा
    साडी चोळी अलंकार आता संपला माहेरीचा
    एकलाच होता तो एकटाच निघून गेला
    सार्या आयुष्याच्या आठवणी ठेवून गेला
    देखणी मूर्ती त्याची फोटोतच विसावली .. ३ ..
    दीवाळीचा दीप त्यांच्या फोटोपुढे लावला
    पणतीच्या प्रकाशाने चेहरा त्याचा उजाळला
    माझ्या भाऊबीजेचा सोहळा अपुराच राहिला
    संपली भाऊबीज आता चंद्र आहे साक्षीला
    शीतल छायेत ही काया माझी कोमेजली
    भाऊबीज कोमेजली
    -जयद्रथ आत्माराम आखाडे
    रा. त्रिवेणी नगर तळवडे
    पोष्ट रुपीनगर तालुका हवेली जिल्हा पुणे.


—–

Thank you for reading this post, don't forget to subscribe!