तिवसा : तालुक्यातील सुरवाडी येथे कुणीतरी अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून तेथून फोटोमागील नगदी ५0 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजताचे सुमारास घडली.
सुरवाडी येथील किशोर पवार हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.तेव्हा घरी त्यांची आई व मुलगी होती.
मात्र दुपारी १२ वाजता त्या त्यांच्या नातेवाईकाकडे गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराला लक्ष करून घरातील गजानन महाराजांच्या फोटोमागे ठेवलेल्या पर्स मधून ४0 हजार रुपये नगदी व कपाटातील सोन्याचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.पवार यांच्या आई घरी परतताच त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त स्वरूपात दिसल्याने घरात चोरी झाल्याची बाब उघडकीस आली.
याबाबत किशोर पवार यांनी तिवसा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.
(Images Credit : Facebook.com)