- तू
- खुशाल पेटव
- दिवाळीचे दिवे
- पण
- लावू नकोस
- धम्माच्या
- तत्वज्ञानाला
- फ़ंडे नवे ..
- मला
- माहीत आहे
- तू जरी
- उच्च शिक्षित असला
- तरी
- बायकोला कोरी साडी
- नेसवून
- मातीच्या लक्ष्मीची
- आरास मांडून
- मांडीला मांडी
- लावून
- खुशाल करशील
- पूजा
- मग
- बावीस प्रतिज्ञाच
- काय ?
- -राजेंद्र क.भटकर
- बडनेरा
—–
Contents hide