- मोबाईलच्या डीपीवर
- जेवढं सुंदर फोटो आपलं
- दिसावं,
- तेवढंच सुंदर विचार
- इतराबदल आपलं असावं.
- जसं आपण रक्ताच नात
- सांभाळतो अगदी तसंच
- सर्वांचं प्रेमाचं, आपुलकीचं
- नातं जपावं.
- व्यसनाधीनाच्या आहारी
- न जाता जे मिळालं
- स्व :कष्टानं त्यातच
- कुटुंबासोबत समाधानी जगावं .
- घामाची किंमत काय असते
- ते कष्ट करून घाम
- गाळणाऱ्या आई बापाकडून शिकावं.
- समाजहित जोपासून
- शैक्षणिक ज्ञान संपादन करून
- इतरांपेक्षा काहीतरी वेगळं
- करून शिवरायासारखा
- इतिहास रचाव.
- सगळ्यात मिळून मिसळून
- गरीब श्रीमंताची दारे नष्ट
- करून आपुलिकीची
- भावना मनाशी बाळगून
- गर्दीतून फक्त आपणच
- उठून दिसाव .
- आपल्यामुळे कोणाच्याही
- डोळ्यात अश्रू झळकू
- देऊच नये असा स्वभाव
- जीवन जगताना स्वं :अंगी असावं.
- अहंकाराला बगल देऊन
- सर्वांशी आपलेपणाने,
- प्रामाणिक वागून
- कोणासोबतच वैर नसावं.
- -सुरेश बा.राठोड
- (कलाशिक्षक)
- राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर जिल्हा.नागपूर
- 9765950144
—–
Contents hide