- गोकुळात नंदाघरी आला
- यशोदेचा गोंडस नंदलाला
- वेणुचे मंजुळ सुर ऐकण्या
- दंग ती मथुरेची ब्रीजबाला
- प्रीत राधेची मुरलीधरावरी
- गोकुळचाच कृष्ण कन्हैया
- खोड्या करीतो यमुनेतीरी
- बांधायची उखळाला मैया
- रंगांयचा खेळ वृंदावनात
- रासलीला गोपीकान्हाचा
- टिपरीवर टिपरी चढताच
- कसा होईल त्रास उन्हाचा
- रमतसे बाललीलांत मैया
- अवखळ तोच लाल भारी
- लाड करीतो बलरामदादा
- करायची तक्रार नर नारी
- मथुरेच्या बाजाराला जाता
- अडवीतसे कान्हा मग वाट
- मारूनीच खडे फोडायचा
- गोपींचा दुध दह्याचा माठ
- सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835
—–
Contents hide