• Sat. Sep 23rd, 2023

प्रामाणिक रहा..…!

    जगताना जरा । व्हावे सावधान ।
    व्यर्थ अभिमान । करू नका ।।
    नका देऊ त्रास । व्यर्थची कोणाला ।
    दुखवू मनाला । नका कोणी ।।
    कोणाचीच सत्ता । नाही कोणावर ।
    ताबा मनावर । ठेवा जरा ।।
    मीपणा म्हणजे । भयंकर रोग ।
    भोगणार भोग । अभिमानी ।।
    प्रामाणिक रहा । आपल्या नात्याशी ।
    लढणे कोणाशी । टाळा जरा ।।
    नात्यात शंकेला । नका देऊ स्थान ।
    मनामध्ये घाण । आणू नका ।।
    स्वतः योग्य मार्ग । पत्करून चला ।
    एकतरी कला । शिकूनिया ।।
    अंतःकाळ येता । मरण्या हसत ।
    पुण्यची सतत । करायचे ।।
    अजु स्वीकारतो । माणुसकी धर्म ।
    करायचे कर्म । मनुष्याचे ।।
    -अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी ता.दारव्हा,
    जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७


—–
(Images Credit : your quote.in)

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,