• Mon. Jun 5th, 2023

प्रवाशांचे हाल : खासगी कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवले.!

    मुंबई:राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचे राज्यभर तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील बारा दिवसांपासून असलेला संप चिघळला असून कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय एस.टी. कर्मचारी उत्फू र्तपणे संपात उतरले आहेत. या संपामुळे परगावी जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी बसेसचा आधार घ्यावा लागत असून खासगी कंपन्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत.

    राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपात कोल्हापूर जिल्हय़ातील कर्मचारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपात उतरले. जिल्हय़ात बारा आगारातून एसटी वाहतूक बंद झाली असून प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात रविवारी मध्यरात्री बारा वाजता संपात चालक, वाहक, यांत्रिकी कामगार, लिपिक वर्ग उतरला आहे. रात्री दोन वाजेपर्यंत बाहेर गावाहून कोल्हापूर आगारात आलेली वाहने सोडण्यात आली. त्यानंतर एसटी वाहतूक बंद ठेवली.

    सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सीबीएससीसह मलकापूर, गारगोटी, कागल, जयसिंगपूर, इचलकरंजी, शिरोळ, राधानगरी, मलकापूर, शाहूवाडी आगारातील कर्मचार्‍यांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्मचार्‍यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत मागण्या केल्या. या संपामुळे परगावी जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी बसेसचा आधार घ्यावा लागत असून खासगी कंपन्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत.


—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *