• Mon. Jun 5th, 2023

प्रत्येकाने घरोघरी संविधान घेऊन वाचन करावे -कालिंदा पवार

    यवतमाळ:दि. २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद आणि कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार भारतर% डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी भारतीय संविधानाचा आत्मा उद्देशिकेचे वाचन व सामूहिक शपथ देण्यात आली. संविधान विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते प्रा.डा?.सतपाल सोहळे यांनी संविधानावर सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद इंगोले कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी केले. डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ सरांनी संविधानामधील महत्त्वाची कलमे स्वातंत्र्य समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये कालींदाताई पवार यांनी संविधान हा ग्रंथ प्रत्येकांनी घरोघरी ठेवावा. एवढेच नव्हे तर त्याचे वाचन करून उपयोगात आणावे. असे आवाहन केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर काका मोहोळ, समाज कल्याण सभापती श्री विजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य चितंगराव कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विनय कुमार ठमके, अरविंद गुडधे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य मनोज चौधरी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे, समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण ,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, कोल्हे,कार्यकारी अभियंता बांधकाम क्रमांक एक. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद भगत, मनोज हुमणे, ज्येष्ठ नेते मार्गदर्शक नामदेवराव थुल,राजेन्द्र खरतडे , तुषार आत्राम,सुहास परेकर,स्वप्नील फुलमाळी, विक्रांत खरतडे व कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे इतर पदाधिकारी सभासद तसेच जिल्हा परिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पर्शिम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन सचिव भारत भितकर यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *