• Sat. Sep 23rd, 2023

पोलिसांची जुगार अड्डय़ावर धाड, १९ आरोपी ताब्यात

    २ लाखांपेक्षा जास्त माल जप्त

    अमरावती : पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने पोलिस स्टेशन खोलापुरीच्या अंतर्गत सुरु असलेल्या जुगारावर धाड टाकून १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २,0१,८५0 रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी व मुद्येमाल पोलीस स्टेशन खोलापुरी गेट यांचे ताब्यात पुढील कारवाईस देण्यात आले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    २५ नोव्हेंबररोजी मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे, पोलिस स्टेशन खोलापुरी गेट हद्दीतील पूर्वीचे मचर्ंट को-ऑपरेटिव्ह बँक असलेल्या रिकाम्या इमारतीमध्ये पत्ता जुगार रेड केली असता जुगार खेळणारे १)शेख जमीर शेख वजीर वय ३५ रा, अलीम नगर २)अन्वर शेख कदीर वय २६ रा. मुझफ्फरपुरा ३)जावेद खान रहीम खान वय ४१ रा. पठाण चौक ४)मयुर नटवरलाल बंजारा वय ३४ रा. नमुना गल्ली ५)शेहजाद खान सत्तार खान वय ३५ रा, जमजमनगर ६)जुनेद खान युनुस खान वय २६ रा. ७)अली एजाज अली उस्मान वय ४५ रा. जमील कॉलनी ८)सैयद सलीम सैयद गुलाम वय ४४ रा. हबीब नगर ९) ननिज जगदीश रावल वय ३८ रा नमुना गल्ली अमरावती १0) शेख जावेद शेख कदीर वय ३९ रा. नमुना गल्ली ११) दिनेश सुखदेवराव वानखडे वय ४४ रा. शेगाव१२)मोहित जुगलकिशोर दिक्षीत वय ४२ रा. बुधवारा १३) तोसिफ खान सिकंदर खान वय ३३ रा. बडनेरा १४)अब्दुल गणी अब्दुल समद वय ५0 रा. जुनीवस्ती बडनेरा १५)इमराण खान ख्यात खान वय २६ रा. साबनपुरा १६)बाळकृष्ण इश्‍वरदास जोंधळे वय ५२रा. बुधवारा १७) मनोज बिरीधर पवार वय ४७ रा. अंबागेट १८)धनराज शंकरराव यादव वय ४५ रा. सवनिस प्लॉट १९)अनंत अंबादास पायरे वय २९ रा. पाटीपुरा अमरावती हे पत्ता जुगार खेळतांना मिळुण आले, यांचे ताब्यातुन नगदी ७१८५0/- रू. व १४ मोबाईल किंमत १३0,000/- रू. असा एकूण २,0१,८५0 रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदर आरोपी व मुद्येमाल पोलीस स्टेशन खोलापुरी गेट यांचे ताब्यात पुढील कारवाईस देण्यात आले आहे.सदर कारवाई डॉ. आरती सिंह पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे आदेशाप्रमाणे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, सुरज चव्हाण ब.न. ४0६, राजिक रायलीवाले ब.न. १८६८, निखील गेडाम ब.न. १२९७ सुभाष पाटील ब.न. १२८0, जहीर शेख ब.न, १११७, रंजीत गावंडे ब.न, ४३६, रोशन व-हाडे ब.न. ४६१ यांनी केली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,