• Sun. May 28th, 2023

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला चार महिने मुदतवाढ

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जून २0२१ रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केलेल्या लोककेंद्री घोषणेला अनुसरून आणि कोविड-१९ ला दिलेल्या आर्थिक प्रतिसादाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पाचव्या टप्प्याला डिसेंबर २0२१पासून मार्च २0२२पयर्ंत अशी आणखी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य दिलेली घरे) तसेच थेट लाभ हस्तांतरणासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत मिळणार आहे.

    या योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा अनुक्रमे एप्रिल ते जून २0२0 आणि जुलै ते नोव्हेंबर २0२0 या काळामध्ये कार्यान्वित झाला तर तिसरा टप्पा मेते जून २0२१ या कालावधीत कार्यान्वित झाला. या योजनेचा चौथा टप्पा जुलै २0२१पासून सुरु झाला असून तो सध्या नोव्हेंबर २0२१पयर्ंत लागू आहे.

    पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पाचव्या टप्प्यामध्ये, डिसेंबर २0२१पासून मार्च २0२२पयर्ंत अन्नधान्य अनुदानापोटी अंदाजित ५३३४४.५२ कोटी रुपयांच्या अन्नधान्याचे वितरण होणार आहे.

    पाचव्या टप्प्यासाठी एकूण १६३ लाख मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचा व्यय अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कोविड-१९ च्या अनपेक्षित प्रसारामुळे देशामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने मार्च २0२0 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ८0 कोटी पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य वाटपाच्या योजनेतून शिधापत्रिकेवर नियमित वितरीत होणार्‍या धान्याखेरीज गहू आणि तांदूळ या धान्यांचे अतिरिक्त मोफत वितरण करण्याची घोषणा केली जेणेकरून गरीब, गरजू आणि वंचित घरांतील लाभार्थ्यांना आर्थिक संकटाच्या काळात पुरेशा अन्नधान्याअभावी राहावे लागू नये.

    आतापयर्ंत या योजनेच्या पहिल्या ते चौथ्या टप्प्यातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जनतेला २.0७ लाख कोटी रुपये किंमतीच्या अन्न अनुदानाद्वारे ६00 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे मोफत वितरण झाले आहे.


(Images Credit : TV9 Marathi)
—–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *