- आली दिवाळी दिवाळी
- येती धनाच्या रे राशि
- करू धन्वंतरि पूजा
- आज धनत्रयोदशी !!
- घरा लक्ष्मी येई गा
- धन आरोग्य घेऊन
- उदंड आयुष्यासाठी
- करा यमाचे पूजन !!
- अरे घामाची कमाई
- असे लक्ष्मीचा निवास
- आन पापाची कमाई
- असे अलक्ष्मीचा वास !!
- पूजा करा तिजोरीची
- आन धातुच्या धनाची
- तया राखता ईमान
- प्राप्ती होई सौभाग्याची !!
- आज करा दान धर्म
- तो सत्पात्रिच असावा
- खजाना धन प्रजेचे
- राजाच चोर नसावा !!
- सर्व ईडा पीडा टळो
- आरोग्य मिळो सर्वांस
- हेचि रे माझे मागने
- त्या धन्वंतरि देवास !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला
- 9923488556
—–
Contents hide