दर्यापूर : दर्यापूर मार्गावरील पावर हाऊसजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून, ते दोघेही येवदा पोलिस स्टेशन हद्दीतील सांगळुद येथील रहिवासी असल्याचे समजते.
सैनी माणिकराव गावंडे (वय ६0) व घरा शेजारचा मुलगा बहुजन रमेर्शाव शेजे (वय २३) हा सैना गावंडे त्यांची प्रकृती ठीक नसल्याने यांना येवदा येथे दवाखान्यामध्ये, आणले होते दवाखान्यामधून घरी परत जाताना एम. एच. २७ / ए. डी. ८९३१ या क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात दिल्याने ते दोघे व्यक्ती जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच दुय्यम ठाणेदार दिलीप पाटील व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तातडीने येवदा येथील पीएससीमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला ते अद्यापही सांगता आले नाही.दर्यापूर येवदा रोडचे कित्येक महिन्यापासून मंद गतीने काम सुरू आहे. हा रोड काही ठिकाणी अर्धवट उकळून ठेवल्याने व रोडच्या कडेला गिट्टीचे ढिगारे लावून ठेवल्याने रहदारी करणार्यांना अतिशय त्रास होत आहे. त्यामुळे येवदा दर्यापूर हा रोड रोजच छोट्या-मोठय़ा अपघाताला आमंत्रण देत आहे. परंतु, बांधकाम विभाग मात्र सुस्त गतीने काम करीत असल्याने हा रोड किती लोकांचे प्राण घेईल त्याची कुठलीही शाश्वती नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रोड तातडीने पूर्ण करावा, ही जनतेची मागणी आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पुढील तपास अमुल बच्छाव यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
- (छाया : संग्रहित)