• Fri. Jun 9th, 2023

दिवा लावू चैतन्याचा…

  दिवा लावू चैतन्याचा
  सारे विकार मिटवू ।
  दिस सुखाचे पाहण्या
  आधी दीनांना हसवू ।।
  नको भेद कहाचाही
  मनी ठेवू प्रेमभाव ।
  दीप लावू आनंदाने
  एक होऊ रंक, राव ।।
  नको कोणास मारण
  घर कोणाचे जाळणे ।
  दुःखामध्ये दुसऱ्यांना
  कधी कशाला ठेवणे? ।।
  स्वतः आनंदी राहून
  देऊ आनंद सर्वांना ।
  दिवाळीच्या दिनी जोडू
  हृदयाशी हृदयांना ।।
  देशातल्या सैन्यासाठी
  चला एक दिवा लावू ।
  माणसाची माणुसकी
  उभ्या जगताला दावू ।।
  -अजय रमेश चव्हाण,
  तरनोळी
  ता.दारव्हा, जि.यवतमाळ
  मो.८८०५८३६२०७


—–
(Images Credit : Lokmat)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *